गंध – Gandha Lyrics in Marathi Sharayu Date 2019
गाण्याचे शीषर्क : गंध
गायक : शरयू दाते
कलाकार : --------
संगीत सौजन्य : टाइम्स म्युझिक मराठी
Gandha Lyrics in Marathi Sharayu Date 2019
तुझा गंध माझ्या अंगावरी रे
जणू रोम रोमातूनी तो झरे
जरी शांत विश्रांत मी साजिरी
तरी अंतरी चंद्र तो मोहरे
असे लाज माझी कल्पातरीची
तुला पाहता चांदणे पाझरे
पानातूनी गर्द हिरव्या झळाळी
किणकिणी काकणी लाज आता सरे
तुझा गोड सहवास, पुलकित हे श्वास
शरदास माझ्या तुझे चांदणे
जरी आज लाली गाली असे रे
चंद्रमा पौर्णिमेचा कवडसा ठरे
तुझा गंध माझ्या अंगावरी रे
जणू रोम रोमातूनी तो झरे
जरी शांत विश्रांत मी साजिरी
तरी अंतरी चंद्र तो मोहरे
0 Comments