सांग कधी कळणार तुला Saang Kadhi Kalnar Tula Lyrics | Aparadh | Suman Kalyanpur, Mahendra Kapoor
![]() |
| Saang Kadhi Kalnar Tula |
गीत : सांग ना कधी कळणार तुला
चित्रपट : अपराध
संगीत : एन दत्त
गीत लेखन : ---
गायक : सुमन कल्याणपूर आणि महेंद्र कपूर
संगीत सौजन्य :-------
Saang Kadhi Kalnar Tula Lyrics
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला
गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी
अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सुरातला
निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला
जुळता डोळे एक वेळी, धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला

0 Comments